इतिहास

मानवी संस्कृतीचा उगम आणि विकास नद्यांच्या खोऱ्यांशी संलग्न आहे. जगभरातल्या आद्य मानवी वसाहती नद्यांच्या काठांभोवती झाल्या आहेत. मुळा–मुठा नद्यांच्या परिसरात वसलेलं पुणे शहरही याला अपवाद नाही.

कालखंड

इ.स.पू. १४०० सुमार – इ.स. ९९३

प्राचीन पुणे

ताम्रपाषाणयुगीन वसाहती, बौद्ध लेणी, पाताळेश्वरासारखी शिल्पकला आणि राष्ट्रकूटकालीन ताम्रपट या सर्व पुराव्यांमधून पुण्याचं प्राचीन अस्तित्व स्पष्ट होतं. पुण्याजवळ थेऊर इथं…

इ.स. १२९६ – इ.स. १३२८

मध्ययुगीन पुणे

देवगिरीच्या यादवांच्या काळात पुण्याचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व वाढलं. पुण्येश्वर, नारायणेश्वर, नागेश्वर, तांबडी जोगेश्वरी यांसारख्या देवस्थानांभोवती नागरी जीवन आकार…

इ.स. १६२५ सुमार – इ.स. १७०३

शिवकालीन पुणे

शहाजीराजे, जिजामाता आणि बालशिवाजी यांच्या आगमनानं पुण्याच्या इतिहासाला निर्णायक वळण मिळालं. आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव यानं जाळपोळ करून गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुण्याचं…

इ.स. १७१४पासून – इ.स. १८०३

पेशवेकालीन पुणे

पुढे पहिले बाजीराव पेशवे आणि नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पुणे ही मराठा साम्राज्याची राजधानी बनली. शनिवारवाडा, पेठांची रचना, वाडे, घाट, बागा, देवळं आणि जलव्यवस्थापन…

१७ नोव्हेंबर १८१८ – इ.स. १८८४

ब्रिटिशकालीन पुणे

पुण्यात १८१८नंतर ब्रिटिश सत्तेखाली छावणी (कॅन्टोन्मेंट), शिक्षणसंस्था, आधुनिक नगररचना आणि सार्वजनिक पायाभूत सोयी विकसित झाल्या. स्वातंत्र्यानंतर उद्योग, शिक्षण, संशोधन…

इ.स. १९०३पासून – इ.स. १९४६

स्वातंत्र्य चळवळीतील पुणे

इ.स. १८१८नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यावर पुण्यानं राजकीय विचारांच्या नव्या पर्वात प्रवेश केला. सत्तेचं केंद्र गमावलेल्या या शहरानं देशाला वैचारिक नेतृत्व दिलं.…

इ.स. १९४७ – इ.स. २००८

स्वातंत्र्योत्तर पुणे

स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षण, उद्योग आणि स्थलांतरामुळे पुण्याचं सामाजिक स्वरूप अधिक बहुविध झालं. देशाच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी पुण्याच्या सामाजिक पोतामध्ये…

राजकीय वाटचाल

पुण्याची राजकीय वाटचाल ही या शहराएवढीच जुनी आणि वळणावळणांची. ती ‘अस्मानी’तून (नैसर्गिक आपत्तीतून) सावरणाऱ्या राजवटींपासून सुरू होते आणि त्यानंतर काही काळातच ‘सुलतानी’नं (मानवनिर्मिती संकटानं) ग्रासली जाते. या दोन्हींतून तावूनसुलाखून बाहेर पडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष पुण्यभूमीत अवतरावा लागतो आणि तिथून या गावाची राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडी पुन्हा बसण्याला सुरुवात होते...

पुण्याच्या राजकीय स्थित्यंतराला राष्ट्रकूटांच्या सत्ताकाळापासून (इ.स. आठवं ते दहावं शतक) सुरुवात झाली, असं म्हणता येतं. त्यांच्या काळात पुणे हे प्रशासकीय विभागाचं महत्त्वाचं केंद्र म्हणून उदयाला आलं. त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या कारकिर्दीत पुण्याचं धार्मिक आणि प्रशासकीय महत्त्व वाढलं. परंतु इ.स. १२९६मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वारीनंतर यादव सत्तेचा अस्त झाला आणि पुणे हे दिल्ली सल्तनतीच्या अधिपत्याखाली गेलं. पुढे खिलजी राजवटीने पुण्याच्या कारभारासाठी बरिया अरब (बडा अरब) याची नियुक्ती केली. त्यानं चाकणमध्ये किल्ला बांधून पुणे विभागाचा अधिकारी म्हणून पुण्याचा कार्यभार पाहण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुमारे दीड शतक पुण्यावर बहामनी सत्ता राहिली. परंतु त्याचे पुढे तुकडे होऊन अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही अस्तित्वात आली. पुणे परगणा निजामशाहीच्या अखत्यारीत गेला. या दोन्ही राजवटींच्या बदलत्या राजकीय समीकरणांतून पुण्याची वाटचाल पुढे आणखी सुमारे दीड शतकापर्यंत होत राहिली.

या निजामशाहीतच मनसबदार असणारे मालोजीराजे भोसले आणि त्यांचे पुत्र शहाजीराजे यांनी पुणे व सुपे परगण्याची जहागिरी आपल्या कर्तृत्व व पराक्रमाच्या जोरावर मिळवली आणि त्यानंतर पुण्याला नवी दिशा मिळाली. जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात आधुनिक पुण्याची पायाभरणी सुरू झाली, तर पहिले बाजीराव आणि नानासाहेब पेशव्यांच्या काळात पुणे ही मराठा साम्राज्याची राजधानी बनली. शनिवारवाडा हा केवळ सत्तेचा केंद्रबिंदू न राहता अखिल भारतीय राजकारणाची सूत्रं हलवणारं प्रभावी राजकीय केंद्र बनलं.

इ.स. १८१८नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यावर पुण्यानं राजकीय विचारांच्या नव्या पर्वात प्रवेश केला. सत्तेचं केंद्र गमावलेल्या या शहरानं देशाला वैचारिक नेतृत्व दिलं. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी घटनात्मक सुधारणा, सामाजिक परिवर्तन आणि विवेकाधिष्ठित राष्ट्रवादाचा पाया घातला. गोपाळ कृष्ण गोखले यांनी उदारमतवादी लोकशाहीची विचारधारा देशभर पोचवली, तर लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा घोष करीत जनतेला राजकीय चळवळीत सक्रिय सहभागी करून घेतलं. गोपाळ गणेश आगरकर यांनी बुद्धिप्रामाण्यवाद आणि सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करून राजकीय विचारांना चिकित्सक अधिष्ठान दिलं.

स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या टप्प्यात काकासाहेब गाडगीळ, शंकरराव मोरे, केशवराव जेधे यासारख्या नेत्यांनी राष्ट्रीय राजकारणात पुण्याचं प्रतिनिधित्व केलं. स्वातंत्र्यानंतर एस.एम. जोशी, ना.ग. गोरे, ग.प्र. प्रधान आणि मोहन धारिया यांनी लोकशाही, समाजवाद, संसदीय परंपरा, पर्यावरण आणि मूल्याधिष्ठित राजकारणाला दिशा दिली. आजही विचारस्वातंत्र्य, सार्वजनिक चर्चा, सामाजिक उत्तरदायित्व आणि लोकशाही मूल्यांचं जतन करणारं शहर म्हणून पुण्याची राजकीय परंपरा देशासाठी प्रेरणादायी मानली जाते.

राजकारणाचे शिल्पकार

राजकारणपेशवेकाल

पहिले बाजीराव पेशवे

मराठा साम्राज्याचे पराक्रमी पेशवे आणि अद्वितीय रणनीतिज्ञ. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत पेशवेपदाची धुरा…

राजकारणब्रिटिशकाल

लहूजी राघोजी साळवे (लहूजी वस्ताद)

एकोणिसाव्या शतकातील क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक. लहूजींच्या आजोबांना छत्रपतींकडून ‘राऊत’ ही पदवी व…

राजकारण · समाजसुधारणास्वातंत्र्य चळवळ

महादेव गोविंद रानडे

न्यायमूर्ती, समाजसुधारक आणि आधुनिक भारतीय राजकीय विचारांचे प्रवर्तक. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घटनात्मक…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

वासुदेव बळवंत फडके

भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सशस्त्र बंड उभारणारे क्रांतिकारक. सार्वजनिक काका व न्या. महादेव गोविंद रानडे यांची…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

गोपाळ कृष्ण गोखले

उदारमतवादी राष्ट्रनेते, संसदपटू आणि ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’चे संस्थापक. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ…

राजकारण · शिक्षणस्वातंत्र्य चळवळ

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

स्वराज्याचे प्रखर पुरस्कर्ते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे लोकनेते. स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि सार्वजनिक उत्सवांच्या…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

केशवराव जेधे

स्वातंत्र्यसैनिक आणि महाराष्ट्रातील शेतकरी व ब्राह्मणेतर चळवळीचं प्रभावी नेतृत्व. स्वातंत्र्यलढा, काँग्रेस संघटन आणि…

राजकारण · उद्योगस्वातंत्र्य चळवळ

काकासाहेब गाडगीळ

स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री. स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्योत्तर राष्ट्रनिर्मितीत…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

बाबूराव सणस

स्वातंत्र्यसैनिक, लोकाभिमुख काँग्रेस नेते आणि पुण्याचे पहिले महापौर. स्वातंत्र्योत्तर काळात पुण्याच्या नागरी प्रशासनाला…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

एस.एम. जोशी

समाजवादी विचारवंत, लोकशाहीवादी नेते आणि जनआंदोलनांचं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्त्व. स्वातंत्र्योत्तर समाजवादी चळवळीचं…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

ना.ग. गोरे

समाजवादी नेते, लेखक आणि संसदीय लोकशाहीचे अभ्यासक. स्वातंत्र्योत्तर काळात समाजवादी विचारांचे प्रभावी प्रचारक. वैचारिक…

राजकारणस्वातंत्र्योत्तर

मोहन धारिया

स्वातंत्र्यसैनिक, केंद्रीय मंत्री आणि पर्यावरणवादी नेते. संसदीय राजकारणाबरोबरच पर्यावरण, ग्रामविकास आणि शाश्वत…

राजकीय किस्से

राजकीय किस्सेमध्ययुगीन

प्रत्येक संकटातून भरारी

राजकीय स्थित्यंतरं आणि प्रसंगी त्यातून येणाऱ्या संकटांना सामोरं जाणं आणि त्या संकटांत आक्रमकांनी राख केली तरी त्यातून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा…

राजकीय किस्सेब्रिटिशकाल

सर्वसामान्यांचा आवाज : पुण्याचे सार्वजनिक काका

पुण्याच्या मध्यवस्तीतल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यानं शनिवारवाड्याकडे जाताना राजा केळकर संग्रहालयाकडे वळणाऱ्या रस्त्यापुढील चौकाचं नाव…

राजकीय किस्सेस्वातंत्र्य चळवळ

अखेरचा खटलाही जिंकणारे लोकमान्य

‘भारतीय असंतोषाचे जनक’ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आयुष्यभर ब्रिटिशांविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध अनेक कायदेशीर लढाया लढल्या. त्यांच्या आयुष्यातल्या…

राजकीय किस्सेस्वातंत्र्य चळवळ

लोकमान्यांच्या स्मृतीचं पाकिस्तानात जतन

भारत आणि पाकिस्तान यांच्या फाळणीनंतर दोन्ही देशांत अनेक रस्ते, चौक आणि शहरांची नावं बदलली गेली. ब्रिटिशांचा ठसा किंवा दुसऱ्या संस्कृतीचे संदर्भ पुसून…

राजकीय किस्सेस्वातंत्र्य चळवळ

हुतात्मा राजगुरू यांची अटक

क्रांतिकारकांच्या कारवायांनी निर्माण केलेली धग म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील सुवर्णपानंच. शिवराम हरी राजगुरू यांनी वयाच्या अवघ्या…

राजकीय किस्सेस्वातंत्र्य चळवळ

वसंत सिनेमात गांधीजी

एकेकाळी पुण्यातली चित्रपट आणि नाट्य गृहं हीदेखील काही गाजलेल्या व्याख्यानांसाठीची व्यासपीठं होती, हे कधी तुमच्या कानावर पडले होते? नाही ना? मग, अशाच…

राजकीय घटना

राजकीय वाटचालीशी संलग्न संस्था

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या आणि आजही कार्यरत संस्थांचा समावेश या यादीत केला आहे.

अनुक्रमे १८१७ व १८२२

पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड

ब्रिटिश सैनिकांच्या वास्तव्यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली. हे बोर्ड छावणी क्षेत्रातील नागरिकांना शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि पाणीपुरवठा यांसारख्या नागरी सुविधा पुरवते.

१८७०

पुणे सार्वजनिक सभा

सरकार आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणे आणि जनतेच्या अडीअडचणी व कायदेशीर हक्कांची जाणीव करून देण्याच्या हेतूने न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांनी या संस्थेची स्थापना केली.

१८८१

केसरी

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेला ‘केसरी’ हे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रवादी विचार आणि जनमत घडवणारं महत्त्वाचं माध्यम ठरलं. आजही पुण्यातून त्याचं प्रकाशन सुरू आहे.

१९०५

भारत सेवक समाज (सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी)

गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेली ही संस्था राष्ट्रसेवा, सामाजिक कार्य आणि सार्वजनिक जीवनासाठी कार्यकर्त्यांची घडण करण्याच्या उद्देशानं काम करत आली आहे.

इतिहासातले लेख

ऐतिहासिक किस्सेप्राचीन

पुण्यविषय ते पुणे

नावात काय आहे, असं तुम्हालाही वाटत असेल, तर थोडा तुमच्या भूमिकेचा फेरविचार करा. त्यातही तुम्ही पुण्यात असाल किंवा पुण्याचे असाल आणि तरीही तुम्हाला हा…

राजकीय किस्सेमध्ययुगीन

प्रत्येक संकटातून भरारी

राजकीय स्थित्यंतरं आणि प्रसंगी त्यातून येणाऱ्या संकटांना सामोरं जाणं आणि त्या संकटांत आक्रमकांनी राख केली तरी त्यातून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा…

ऐतिहासिक किस्सेपेशवेकाल

शनिवारवाड्याच्या आगी

पुण्याच्या इतिहासात शनिवारवाडा हा केवळ पेशव्यांच्या सत्तेचं प्रतीक नाही, तर वैभव, विजय, राजकारण, कारस्थानं आणि काही दुर्दैवी घटनांचा मूक साक्षीदारही…

संबंधित व्यक्ती

इतिहासशिवकाल

छत्रपती शिवाजी महाराज

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि दूरदर्शी राष्ट्रनिर्माते. पुण्यातील बालपण, लाल महाल आणि स्वराज्यस्थापनेची प्रारंभिक घडण.…

समाजसुधारणाशिवकाल

राजमाता जिजाऊ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता आणि स्वराज्याच्या मूल्यांची जडणघडण करणाऱ्या दूरदर्शी राष्ट्रमाता. इ.स. १६३०च्या दशकात…

राजकारणपेशवेकाल

पहिले बाजीराव पेशवे

मराठा साम्राज्याचे पराक्रमी पेशवे आणि अद्वितीय रणनीतिज्ञ. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत पेशवेपदाची धुरा…

इतिहासप्राचीन

राष्ट्रकूट राजा कृष्णराज

राष्ट्रकूट साम्राज्याचा पराक्रमी सम्राट आणि कैलास लेण्यांचा निर्माता. इ.स. ७५८च्या ताम्रपटात ‘पुण्यविषय’चा उल्लेख करणारा…

इतिहासमध्ययुगीन

संत ज्ञानेश्वर महाराज

मराठी संतसाहित्याचे आद्य तत्त्वज्ञ आणि ‘भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी)’चे कर्ते. वारकरी भक्तिपरंपरेचा पाया घालून तिला…

इतिहासशिवकाल

संत तुकाराम महाराज

वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संतकवी आणि अभंगकार. यांच्यामुळे महाराष्ट्राला भक्ती आणि समतेचा प्रभावी सामाजिक-सांस्कृतिक…

संबंधित स्थळे

इतिहासाशी संलग्न संस्था

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या आणि आजही कार्यरत संस्थांचा समावेश या यादीत केला आहे.

१८८८

आनंदाश्रम संस्था

संस्कृत ग्रंथ, दुर्मिळ हस्तलिखितं आणि भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतन-संशोधनासाठी ही संस्था कार्यरत आहे.

१९१०

भारत इतिहास संशोधक मंडळ

ही संस्था मराठा आणि भारतीय इतिहासाशी संबंधित अस्सल कागदपत्रं, हस्तलिखितं आणि ऐतिहासिक साधनांचं संकलन, जतन आणि संशोधन करते.

१९१७

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था

संस्कृत, प्राच्यविद्या, भारतीय इतिहास आणि हस्तलिखितांच्या संशोधनासाठी ही संस्था देश-विदेशात नावाजलेली आहे.