कालखंड · इ.स. १६२५ सुमार – इ.स. १७०३

शिवकालीन पुणे

शहाजीराजे, जिजामाता आणि बालशिवाजी यांच्या आगमनानं पुण्याच्या इतिहासाला निर्णायक वळण मिळालं. आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव यानं जाळपोळ करून गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुण्याचं पुनर्वसन झालं; कसबा गणपतीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि लाल महाल उभा राहिला. प्राचीन व मध्ययुगीन काळात गाढवाचा नांगर फिरवणे हा अत्यंत क्रूर व राजकीय सूडबुद्धीचा प्रकार मानला जाई. परंतु, याच भूमीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया रचला गेला आणि पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून त्याची सुरुवात केली गेली. मौजे पुण्याला कसबे पुणे हे रूप येऊ लागलं.

शिवपूर्वकाळातील पुणे हे देवालयं, शेती आणि पारंपरिक ग्रामजीवनाभोवती उभं राहिलेलं छोटं केंद्र होतं. विविध समाजघटक परस्परावलंबी पद्धतीनं जगत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणात राजमाता जिजाऊ यांनी पुण्याचं पुनर्वसन केलं, विस्कळीत झालेल्या समाजजीवनाला पुन्हा उभारी दिली आणि शेती, देवस्थान व्यवस्था व लोकजीवनाला स्थैर्य दिलं. परागंदा झालेल्या रयतेला परत बोलावून पहिल्या पाच वर्षांची सारामाफी जाहीर करण्यात आली आणि नव्या सामाजिक जीवनाची सुरुवात झाली.

मजकूर: ‘पुणेरी’ विभागातील ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वाटचालीमधून.

या कालखंडातील नोंदी

या कालखंडातील लेख

या कालखंडातील व्यक्ती

सर्व व्यक्ती

या कालखंडातील स्थळे

ऐतिहासिक वास्तूशिवकालपुणे शहर

लाल महाल

वाडा उभारताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतींना वंदन करण्यासाठी, शिवरायांचं बालपण जिथं गेलं त्या ऐतिहासिक लाल महालातली माती शनिवारवाड्याच्या…

मंदिरे व देवस्थानंशिवकालपुणे शहर

कसबा गणपती मंदिर

आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव यानं जाळपोळ करून गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुण्याचं पुनर्वसन झालं; कसबा गणपतीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि लाल…

मंदिरे व देवस्थानंशिवकालपुणे शहर

कस्तुरे चौक विठ्ठल मंदिर

या कस्तुरे चौक विठ्ठल मंदिराच्या जवळच तुकाराम महाराजांची सासुरवाडी म्हणजे गुळवे सावकार यांचं घर होतं.

पेठाशिवकालपुणे शहर

सोमवार पेठ

त्यानंतरची वस्ती शहाजीराजांच्या ताब्यात पुणे परगणा आल्यानंतर आजच्या सोमवार पेठ परिसरात (इ.स. १६२५च्या सुमारास) झाली.

पेठाशिवकालपुणे शहर

शनिवार पेठ

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील निळोपंत मुजुमदार यांनी शुक्रवार व रविवार पेठा वसवल्या, तर मोरोपंत पिंगळे यांनी शनिवार पेठ.

पेठाशिवकालपुणे शहर

बुधवार पेठ

भवानी व घोरपडे या पेठा संभाजी महाराजांच्या कार्यकाळात वसवण्यात आल्या, तर बुधवार पेठ औरंगजेबानं वसवून तिला सुरुवातीला मुहिताबाद असं नाव दिलं.

← मध्ययुगीन पुणेपेशवेकालीन पुणे