कालखंड · इ.स.पू. १४०० सुमार – इ.स. ९९३
प्राचीन पुणे
ताम्रपाषाणयुगीन वसाहती, बौद्ध लेणी, पाताळेश्वरासारखी शिल्पकला आणि राष्ट्रकूटकालीन ताम्रपट या सर्व पुराव्यांमधून पुण्याचं प्राचीन अस्तित्व स्पष्ट होतं. पुण्याजवळ थेऊर इथं आद्य शेतकऱ्यांची एक वसाहत संशोधनात आढळून आली आहे. ती मुठा नदीच्या उजव्या तीरावर होती. नदीच्या डाव्या तीरावर साष्टेवाडी इथंही ताम्रपाषाणयुगीन अवशेष आढळले आहेत. इसवी सनपूर्व दुसरं शतक ते इसवी सनाचं पहिलं शतक या सातवाहनांच्या कालखंडात पुणे परिसरात भाजे, बेडसे, कार्ले इथं बौद्ध लेणी कोरली गेली आहेत.
राष्ट्रकूट राजा कृष्णराजाच्या इ.स. ७५८मधल्या ताम्रपटात ‘पुण्यविषय’ असा आजच्या या शहराचा ऐतिहासिक उल्लेख आढळतो. विषय म्हणजे प्रांत आणि पुण्य हे त्या प्रांताचं केंद्र. त्यावरून पुणे हे प्राचीन काळापासून प्रशासकीय केंद्र म्हणून विकसित होत होतं, हे सिद्ध होतं.
मजकूर: ‘पुणेरी’ विभागातील ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वाटचालीमधून.
या कालखंडातील लेख
पुण्यविषय ते पुणे
नावात काय आहे, असं तुम्हालाही वाटत असेल, तर थोडा तुमच्या भूमिकेचा फेरविचार करा. त्यातही तुम्ही पुण्यात असाल किंवा पुण्याचे असाल आणि तरीही तुम्हाला हा…
थेऊरजवळ आद्य वसाहत
पुणे या नावाचा महिमा आणि इतिहास जेवढा प्राचीन, त्यापेक्षा या परिसरातील लोकवस्तीचा इतिहास प्राचीन आहे... आणि त्याचे धागेदोरे पुण्याच्या मध्यवस्तीतून…
या कालखंडातील व्यक्ती
सर्व व्यक्तीया कालखंडातील स्थळे
पाताळेश्वर
ताम्रपाषाणयुगीन वसाहती, बौद्ध लेणी, पाताळेश्वरासारखी शिल्पकला आणि राष्ट्रकूटकालीन ताम्रपट या सर्व पुराव्यांमधून पुण्याचं प्राचीन अस्तित्व स्पष्ट होतं.
थेऊर
पुण्याच्या परिसरात इ.स.पू. चौदाशेच्या सुमारास सर्वप्रथम अशी वसाहत झाली. ती होती सध्याच्या थेऊरमध्ये, मुठा नदीच्या उजव्या तीरावर.
कार्ले, भाजे, बेडसे लेणी
इसवी सनपूर्व दुसरं शतक ते इसवी सनाचं पहिलं शतक या सातवाहनांच्या कालखंडात पुणे परिसरात भाजे, बेडसे, कार्ले इथं बौद्ध लेणी कोरली गेली आहेत. हे धेनुकाकट…