कालखंड · १७ नोव्हेंबर १८१८ – इ.स. १८८४
ब्रिटिशकालीन पुणे
पुण्यात १८१८नंतर ब्रिटिश सत्तेखाली छावणी (कॅन्टोन्मेंट), शिक्षणसंस्था, आधुनिक नगररचना आणि सार्वजनिक पायाभूत सोयी विकसित झाल्या. स्वातंत्र्यानंतर उद्योग, शिक्षण, संशोधन आणि माहिती-तंत्रज्ञानामुळे शहराचा झपाट्यानं विस्तार झाला.
ब्रिटिश काळात पुण्याच्या सामाजिक इतिहासानं निर्णायक वळण घेतलं. एकीकडे ‘ब्रिटिश पुणे’ आणि ‘भारतीय पुणे’ अशी सामाजिक विभागणी झाली, तर दुसरीकडे आधुनिक शिक्षण, नगरव्यवस्था, वृत्तपत्रं, क्रीडा, सार्वजनिक संस्था आणि नव्या विचारांचा प्रसार सुरू झाला. पुणे हे सामाजिक सुधारणांचं आणि वैचारिक मंथनाचं केंद्र बनलं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, महर्षि कर्वे, पंडिता रमाबाई आणि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यामुळे स्त्रीशिक्षण, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन आणि सामाजिक समता या चळवळींना नवी ऊर्जा मिळाली.
ब्रिटिशकाळात पुण्याच्या अर्थव्यवस्थेनं पारंपरिक बाजारपेठेपासून आधुनिक नागरी अर्थव्यवस्थेकडे वाटचाल केली. लष्करी छावणी, रेल्वे, शिक्षणसंस्था, सरकारी कार्यालयं आणि नव्या नागरी सोयींमुळे रोजगार व सेवाक्षेत्र वाढलं. मुद्रण, प्रकाशन, शिक्षण आणि सार्वजनिक संस्थांच्या वाढीनं ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेची पायाभरणी झाली.
मजकूर: ‘पुणेरी’ विभागातील ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वाटचालीमधून.
या कालखंडातील नोंदी
या कालखंडातील लेख
सर्वसामान्यांचा आवाज : पुण्याचे सार्वजनिक काका
पुण्याच्या मध्यवस्तीतल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यानं शनिवारवाड्याकडे जाताना राजा केळकर संग्रहालयाकडे वळणाऱ्या रस्त्यापुढील चौकाचं नाव…
चहाच्या पेल्यांतून वादळ
इरसालपणा हेदेखील पुणेरी व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणावं का? असेलही कदाचित. किमान, गोपाळराव जोशी या पत्रकारानं एका शतकापूर्वी केलेली ही पोलखोल आणि…
टांग्यांचा खडखडाट
आज पुण्याच्या रस्त्यांवर वेगवान मोटारी धावत असल्या, तरी एकेकाळी या शहराची ओळख टांग्यांच्या खडखडाटानं होत असे. पेशवेकाळात सुरू झालेली आणि ब्रिटिश काळात…
एका संग्रहालयाची गोष्ट
पुण्यातल्या घोले रस्त्यावरच्या महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाची वाटचाल ही तिथल्या वस्तुसंग्रहाएवढीच अचंबित करणारी आहे. एका प्रदर्शनातून झालेली त्याची…
कंत्राटदार महात्मा फुले
महात्मा जोतीराव फुले हे केवळ महान समाजसुधारकच नव्हते, तर एक यशस्वी व्यावसायिक आणि आजच्या पुण्याचीही ओळख असणाऱ्या पायाभूत सोयींच्या भव्य प्रकल्पांचे…
बॅडमिंटनची जन्मभूमी
तुम्हाला पूना गेम माहिती आहे? नावावरून अंदाज आलाच असेल, की या खेळाचं पुण्याशी पक्कं नातं आहे. आज या नावानं कुठलाच खेळ खेळला जात नाही. परंतु हा खेळ…
या कालखंडातील व्यक्ती
सर्व व्यक्तीलहूजी राघोजी साळवे (लहूजी वस्ताद)
एकोणिसाव्या शतकातील क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक. लहूजींच्या आजोबांना छत्रपतींकडून ‘राऊत’ ही पदवी व…
महात्मा जोतीराव फुले
समाजसुधारक, विचारवंत आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक. स्त्रीशिक्षण, शूद्र-अतिशूद्रांचं शिक्षण आणि सामाजिक समतेसाठी आयुष्य…
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका आणि स्त्रीशिक्षण चळवळीच्या अग्रणी. पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा…
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
समाजसुधारक, लेखक आणि आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीचे अग्रदूत. ‘शतपत्रे’मधून सामाजिक सुधारणा आणि विवेकवादी…
सरदार दोराबजी पदमजी
पुणे नगरपालिकेचे १८८७पासून १९०२पर्यंत १६ वर्षं अध्यक्ष. शास्त्रीय संशोधनाकडे कल. त्यातूनच १८८४मध्ये बंधू नवरोसजी यांच्या…
प्रा. केरो लक्ष्मण छत्रे
गणितज्ञ, ज्योतिषशास्त्रज्ञ आणि सृष्टिशास्त्रज्ञ. केरोनाना नावानं सर्वश्रुत. ‘ग्रहसाधनाची कोष्टके’ हा त्यांचा सर्वाधिक…
महादेव बल्लाळ नामजोशी
एकोणिसाव्या शतकातले द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योजक. लोकमान्य टिळकांचे समकालीन. औद्योगिक व तांत्रिक प्रगतीची गरज ओळखून…
या कालखंडातील स्थळे
बंडगार्डन पूल
१३ कमानी आणि आठशे फूट लांबीच्या या पुलाला आता वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.
पुलगेट
तिथं असलेल्या एका पुलाजवळ ब्रिटिशांचा मुख्य तपासणी नाका म्हणजेच हे गेट होतं. त्यामुळेच लोक त्याला पुलगेट म्हणू लागले.
भिडे वाडा
१८४८मध्ये पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या भिडे वाड्यात मुलींच्या पहिल्या शाळेद्वारे शिक्षणकार्याला सुरुवात; पुढे वंचितांसाठीही अनेक शैक्षणिक उपक्रम.
महात्मा फुले मंडई
स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुले मंडई आणि तिथल्या तत्कालीन मिनर्व्हा टॉकीजसमोरचं पटांगण हे पुण्यातील राजकीय सभास्थान होतं.
डेक्कन कॉलेज
आज ज्या जागी डेक्कन कॉलेज आहे, त्या परिसरात मुळा-मुठेच्या संगमाजवळ बांधकाम करताना लाख-दीड लाख वर्षांपूर्वीची अश्मयुगीन हत्यारं आढळली आहेत.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ
१८५४मध्ये ब्रिटिशांनी स्थापन केलेलं आणि आशिया खंडातलं तिसरं सर्वांत जुनं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सध्याचं सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ)…