पुणे

मानवी संस्कृतीचा उगम आणि विकास नद्यांच्या खोऱ्यांशी संलग्न आहे. जगभरातल्या आद्य मानवी वसाहती नद्यांच्या काठांभोवती झाल्या आहेत. मुळा–मुठा नद्यांच्या परिसरात वसलेलं पुणे शहरही याला अपवाद नाही.

पुण्याची ओळख

पुण्याची सामाजिक वाटचाल ही केवळ एका शहराची कथा नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाची गाथा आहे. मुळा-मुठेच्या काठी वसलेल्या या नगरीनं परंपरा आणि परिवर्तन यांचा समतोल साधत समाजजीवनाला नवी दिशा दिली.

पुण्याची राजकीय वाटचाल ही या शहराएवढीच जुनी आणि वळणावळणांची. ती ‘अस्मानी’तून (नैसर्गिक आपत्तीतून) सावरणाऱ्या राजवटींपासून सुरू होते आणि त्यानंतर काही काळातच ‘सुलतानी’नं (मानवनिर्मिती संकटानं) ग्रासली जाते. या दोन्हींतून तावूनसुलाखून बाहेर पडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष पुण्यभूमीत अवतरावा लागतो आणि तिथून या गावाची राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडी पुन्हा बसण्याला सुरुवात होते...

पुण्याच्या नावाची कहाणी

पुण्याचा पहिला उल्लेख असणारा लिखित पुरावा राष्ट्रकूट राजा कृष्णराज याच्या एका ताम्रपटातील शके ६८०च्या (इ.स. ७५८) दानलेखात आढळतो. त्यानुसार, या कृष्णराजानं म्हणे सूर्यग्रहण पर्वणीच्या निमित्तानं ‘पुण्यविषयां’तर्गत (म्हणजे पुणे प्रांतातील) बोपखळु (बोपखेल) हे गाव दान दिलं होतं.

  1. पुण्यविषयइ.स. ७५८ · राष्ट्रकूट ताम्रपट
  2. पूनकविषयइ.स. ७६८ सुमार
  3. पुणकविषयइ.स. ९९३ · शिलाहार ताम्रपट
  4. कसबे पुणेनिजामशाही आणि शिवकाळ
  5. पुणेआजचं नावरूप
नावाची वाटचाल, ‘पुण्यविषय ते पुणे’ या लेखातील नोंदींनुसार. ताम्रपटाचं रेखांकन प्रतीकात्मक आहे.

पुणे एका नजरेत

नद्या
मुळा आणि मुठा; संगमानंतर मुळा-मुठा
पहिला लिखित उल्लेख
इ.स. ७५८, राष्ट्रकूट राजा कृष्णराजाचा ताम्रपट (‘पुण्यविषय’)
सर्वांत जुनी वस्ती
कसबा पेठ
मराठा साम्राज्याची राजधानी
पहिले बाजीराव आणि नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत
इंग्रज अंमल
१८१८पासून
पेशवेकालीन बागा
सुमारे १००; त्यांपैकी किमान ३१ पेशव्यांच्या
विद्यापीठ
१९४९, पुणे विद्यापीठ (सध्याचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
आयटी केंद्रं
हिंजवडी, मगरपट्टा सिटी, खराडी, येरवडा
ओळख
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी · विद्येचं माहेरघर · क्रीडानगरी
लोकसंख्या, क्षेत्रफळ, उंची

अधिकृत आकडेवारी आणि तिचा स्रोत क्लायंटकडून येणे बाकी.

मुळा-मुठा आणि पुणे

पुण्याच्या मध्यवस्तीतून वाहणारी मुठा नदी या शहराची पूर्व-पश्चिम अशी विभागणी करत पुढे जाते. ही विभागणी केवळ भौगोलिक नव्हे, तर सांस्कृतिकही मानली जाते. या दोन्ही भागांना सर्वार्थानं जोडतात ते या नदीवरचे पूल आणि त्यांमध्ये सर्वांच्या तोंडी असणारं नाव म्हणजे लकडी पुलाचं (आजचा छत्रपती संभाजी महाराज पूल).

पाणीपुरवठा हा पुण्यासाठी नेहमीच चर्चेचा आणि शहराच्या स्वास्थ्याचा विषय राहिला आहे! छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यासाठीचा पहिला प्रयत्न झाल्याच्या नोंदी आढळतात.

मुठा मुळा मुळा-मुठा संगमकसबाशनिवारसदाशिवनारायणबुधवाररविवारशुक्रवारसोमवारमंगळवारनानाभवानीशिवाजीनगरडेक्कनकॅम्प (लष्कर)पर्वतीयेरवडाखडकीकात्रजकडे ↓उमुळा, मुठा आणि जुन्या जलवाहिन्या · रेखाचित्र

आजचे पुणे

आज पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, देशातील महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र आणि आधुनिक उद्योग-तंत्रज्ञानाचं अग्रणी शहर म्हणून ओळखलं जातं. मात्र या आधुनिकतेच्या प्रवासातही मुळा–मुठेच्या काठावर उभा राहिलेला इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचा समृद्ध वारसा पुण्याची खरी ओळख जपून आहे.

विविध आयटी केंद्रं, शैक्षणिक आणि संशोधन संस्था यांच्या बळावर आज पुणे औद्योगिक वारसा, तंत्रज्ञान, ज्ञान आणि नवउद्योजकता यांची सांगड घालणारं बहुआयामी आर्थिक महानगर म्हणून उभं आहे. कुशल मनुष्यबळाला मागणी आणि सेवाक्षेत्राचा विस्तार यांमुळे हे महानगर तरुणाईसाठी आकर्षणबिंदू ठरला आहे.

ज्ञान, संशोधन, उद्योग आणि राष्ट्रीय सुरक्षेचा संगम घडवणाऱ्या या वाटचालीमुळे पुणे आज केवळ शिक्षणाचं किंवा संस्कृतीचं नव्हे, तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि संरक्षण या क्षेत्रांतील भारताच्या प्रगतीचंही एक प्रभावी केंद्र बनलं आहे.