कालखंड · इ.स. १९४७ – इ.स. २००८

स्वातंत्र्योत्तर पुणे

स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षण, उद्योग आणि स्थलांतरामुळे पुण्याचं सामाजिक स्वरूप अधिक बहुविध झालं. देशाच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी पुण्याच्या सामाजिक पोतामध्ये भर घातली. सिंध आणि पंजाबमधून आलेल्या निर्वासितांनी उद्योग, व्यापार आणि उद्यमशीलतेची नवी संस्कृती रुजवली.

स्वातंत्र्योत्तर पुण्यानं मात्र औद्योगिकीकरणाची झेप घेतली. मात्र, त्यातही या शहराची तोवरची प्रतिमा आणि राज्यकर्ते व प्रशासकांचा दृष्टिकोन यांचा बहुधा अडसर ठरला असावा. खुद्द उद्योगमहर्षि शंतनुराव किर्लोस्कर यांनी तसं भाष्य एका लेखात केलं आहे. किर्लोस्कर ऑइल इंजिन्स हा उद्योग १९४६मध्ये पुण्यात आला त्या सुमारास पुण्यात कारखानदारीला पूरक वातावरण नव्हतं; पुणे हा शिक्षण व पेन्शनरांचा स्वर्ग आहे, त्याचा नरक होईल, अशी भीती खुद्द तत्कालीन कलेक्टरांनी व्यक्त केली होती, अशी आठवण शंतनुरावांनी या लेखात लिहिली आहे. त्याही स्थितीत पुण्यात कारखाने वाढू लागल्यावर ते पिंपरीत जाऊ देत, अशी चळवळ सुरू झाल्याचाही या लेखात उल्लेख आहे.

आज पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, देशातील महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र आणि आधुनिक उद्योग-तंत्रज्ञानाचं अग्रणी शहर म्हणून ओळखलं जातं. मात्र या आधुनिकतेच्या प्रवासातही मुळा–मुठेच्या काठावर उभा राहिलेला इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचा समृद्ध वारसा पुण्याची खरी ओळख जपून आहे.

मजकूर: ‘पुणेरी’ विभागातील ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वाटचालीमधून.

या कालखंडातील नोंदी

या कालखंडातील लेख

राजकीय किस्सेस्वातंत्र्योत्तर

राजकीय सभांचं व्यासपीठ

तिरकसपणासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणेकरांची भाषण आणि संभाषण कला हा मतमतांतरांचा विषय ठरू शकतो. परंतु हेच पुणेकर उत्तम श्रोतेही आहेत, याविषयी मतमतांतरं…

सामाजिक किस्सेस्वातंत्र्योत्तर

पुणेरीपणाचा अर्क

पुणेरी स्वभाववैशिष्ट्यं, समोरच्याला शब्दांनी गारद करण्याचं कसब आणि अचाट बुद्धिमत्ता यांचा मिलाफ असणारी अनेक अवलिया व्यक्तिमत्त्वं पुण्याच्या सार्वजनिक…

सामाजिक किस्सेस्वातंत्र्योत्तर

खड्डे न पडणारा रस्ता

‘नेमेचि येतो मग पावसाळा, कौतुक हे सृष्टीचे जाण बाळा,’ अशा मराठीतल्या प्रसिद्ध काव्यपंक्ती आहेत. कदाचित दर पावसाळ्यात पुणेकरांना मात्र, ‘रहस्य हे…

पुणेरी शोधस्वातंत्र्योत्तर

साखर कारखान्याच्या जागी आयटी हब

हिंजवडीतला राजीव गांधी इन्फोटेक पार्क आज ज्या जागेवर उभा आहे, तिथं खरं तर एक साखर कारखाना उभा राहणार होता, हे आपल्याला माहिती आहे? ज्या गगनचुंबी…

या कालखंडातील व्यक्ती

सर्व व्यक्ती
राजकारणस्वातंत्र्योत्तर

मोहन धारिया

स्वातंत्र्यसैनिक, केंद्रीय मंत्री आणि पर्यावरणवादी नेते. संसदीय राजकारणाबरोबरच पर्यावरण, ग्रामविकास आणि शाश्वत…

उद्योगस्वातंत्र्योत्तर

राहुल बजाज

बजाज समूहाला जागतिक पातळीवर नेणारे आणि भारताच्या वाहनउद्योग क्षेत्राचे आधुनिकीकरण करणारे उद्योगपती. लोकप्रिय दुचाकी…

उद्योगस्वातंत्र्योत्तर

डॉ. सायरस पूनावाला

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक. जगातल्या सर्वांत मोठ्या लस उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जागतिक आरोग्य क्षेत्रात…

उद्योगस्वातंत्र्योत्तर

बाबा कल्याणी

भारत फोर्जचे अध्यक्ष. त्यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फोर्जिंग कंपनी. पुण्याच्या…

उद्योगस्वातंत्र्योत्तर

कैलास व संजय काटकर

क्विक हील या भारतातल्या सर्वांत लोकप्रिय व अग्रगण्य सायबर सुरक्षा कंपनीचे संस्थापक बंधुद्वय. कौटुंबिक परिस्थितीमुळे…

साहित्यस्वातंत्र्योत्तर

ग.दि. माडगूळकर (गदिमा)

‘आधुनिक वाल्मीकी’ म्हणून ओळखले जाणारे; आपल्या काव्य आणि गीतलेखनानं मराठी संस्कृतीला समृद्ध करणारे प्रतिभावंत. त्यांनी…

साहित्य · नाटकस्वातंत्र्योत्तर

पु.ल. देशपांडे

लेखक, नाटककार, नट आणि संगीतकार असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. मार्मिक, सूक्ष्म व चोखंदळ निरीक्षणं आणि प्रसन्न विनोद हे…

संगीत · नाटकस्वातंत्र्योत्तर

वसंतराव देशपांडे

पटियाला आणि भेंडीबाजार या घराण्यांच्या गायकीचा सुरेख संगम साधणारे ख्यातनाम शास्त्रीय गायक आणि नाट्यअभिनेते. ‘कट्यार…

संगीतस्वातंत्र्योत्तर

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी

किराणा घराण्याचे प्रख्यात गायक. शास्त्रीय संगीताचा ध्यास घेऊन वयाच्या अकराव्या वर्षी घराचा त्याग. १९४६मध्ये सवाई…

या कालखंडातील स्थळे

पेठास्वातंत्र्योत्तरपुणे शहर

सेनादत्त (नवी) पेठ

त्याला अपवाद सेनादत्त (नव्या) पेठेचा. ती पानशेत धरणफुटीनंतर पुण्यातील पूरग्रस्तांसाठी वसवण्यात आली.

बोळ व रस्तेस्वातंत्र्योत्तरपुणे शहर

जंगली महाराज रस्ता

पुण्याच्या मध्यवर्ती भागातल्या या रस्त्यानं बांधकाम पूर्ण झाल्यापासून आजवर एकही खड्डा न पडता उत्तम गुणवत्तेचा एक अनोखा आणि अढळ आदर्श प्रस्थापित केला…

क्रीडास्वातंत्र्योत्तरपुणे शहर

नेहरू स्टेडियम

नेहरू स्टेडियम म्हटलं, की पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये असणाऱ्या या क्रिकेटच्या मैदानाचं आजचं रूप डोळ्यांपुढे येणं स्वाभाविक आहे.

सांस्कृतिकस्वातंत्र्योत्तरपुणे शहर

बालगंधर्व रंगमंदिर

पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीत पुढाकार, मुक्तांगण या व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या उभारणीत मोलाचा हातभार.

औद्योगिकस्वातंत्र्योत्तरपुणे शहर

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, खडकी

१९४६मध्ये खडकीत पुण्यातील पहिल्या आधुनिक कारखान्याची किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या रूपात स्थापना.

क्रीडास्वातंत्र्योत्तरमावळ

गहुंजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत गहुंजे इथल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममुळे क्रिकेटच्या नकाशावरही पुण्याचं स्थान अधिक ठळक झालं; पुणे मॅरेथॉनसारख्या…

← स्वातंत्र्य चळवळीतील पुणे