पुण्याला समजून घेण्याचा डिजिटल प्रवास
पुणे :इतिहास, संस्कृती आणि वर्तमानाचा प्रवास
एक शहर. अनेक काळ. असंख्य कथा.
पूर्ण-रुंदीच्या छायाचित्राची जागा. प्रतिमा निवड होईपर्यंत मुळा-मुठा आणि पेठांचं रेखाचित्र वापरलं आहे.
पुणे म्हणजे केवळ एक शहर नाही…
आज पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, देशातील महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र आणि आधुनिक उद्योग-तंत्रज्ञानाचं अग्रणी शहर म्हणून ओळखलं जातं. मात्र या आधुनिकतेच्या प्रवासातही मुळा–मुठेच्या काठावर उभा राहिलेला इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचा समृद्ध वारसा पुण्याची खरी ओळख जपून आहे.
पुण्याचा शोध घ्या
इतिहास
मुळा–मुठेच्या काठावर उभा राहिलेला इतिहास
९ लेख · १० व्यक्तीसमाज
परंपरा आणि परिवर्तन यांचा समतोल
१२ लेखसंस्कृती
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी
११ व्यक्ती · २५ संस्थाशिक्षण
विद्येचं माहेरघर
६ लेख · ७ व्यक्तीक्रीडा
क्रीडानगरी
४ लेख · १० व्यक्तीउद्योग
बहुआयामी आर्थिक महानगर
३ लेख · ६ व्यक्तीविज्ञान
विज्ञाननगरी व संरक्षण केंद्र
४२ स्थळेवारसा
वाडे, घाट, बागा, देवळं आणि जलव्यवस्थापन
काळाच्या ओघात पुणे
इ.स.पू. १४०० सुमार – इ.स. ९९३
प्राचीन पुणे
ताम्रपाषाणयुगीन वसाहती, बौद्ध लेणी, पाताळेश्वरासारखी शिल्पकला आणि राष्ट्रकूटकालीन ताम्रपट या सर्व पुराव्यांमधून पुण्याचं प्राचीन अस्तित्व स्पष्ट होतं. पुण्याजवळ थेऊर इथं आद्य शेतकऱ्यांची एक वसाहत संशोधनात आढळून आली आहे. ती मुठा नदीच्या उजव्या तीरावर होती. नदीच्या डाव्या तीरावर साष्टेवाडी इथंही ताम्रपाषाणयुगीन अवशेष आढळले आहेत. इसवी सनपूर्व दुसरं शतक ते इसवी सनाचं पहिलं शतक या सातवाहनांच्या कालखंडात पुणे परिसरात भाजे…
हा कालखंड पाहा- इ.स.पू. १४०० सुमारथेऊर येथे मुठेच्या उजव्या तीरावर पुणे परिसरातली पहिली शेतकरी वसाहत
- इ.स.पू. दुसरं शतक ते इ.स. पहिलं शतकसातवाहन काळात भाजे, बेडसे, कार्ले इथं बौद्ध लेणी
- इ.स. ७५८राष्ट्रकूट राजा कृष्णराजाच्या ताम्रपटात ‘पुण्यविषय’ असा पहिला लिखित उल्लेख
- इ.स. ७६८ सुमारकृष्णराजाच्या आणखी एका ताम्रपटात ‘पूनकविषय’ असा उल्लेख
- इ.स. ९९३शिलाहार राजा अपराजित देव याच्या जंजिरा ताम्रपटात ‘पुणकविषया’चा उल्लेख
इ.स. १२९६ – इ.स. १३२८
मध्ययुगीन पुणे
देवगिरीच्या यादवांच्या काळात पुण्याचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व वाढलं. पुण्येश्वर, नारायणेश्वर, नागेश्वर, तांबडी जोगेश्वरी यांसारख्या देवस्थानांभोवती नागरी जीवन आकार घेत गेलं. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या काळात पुणे वारकरी परंपरेच्या प्रभावाखाली आलं. पुढे दिल्ली सल्तनत, बहामनी, निजामशाही आणि आदिलशाही यांच्या सत्ताबदलांनी शहराचं स्वरूप बदललं; तरीही पुण्यानं आपलं स्थान कायम राखलं.
हा कालखंड पाहा- इ.स. १२९६अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वारीनंतर यादव सत्तेचा अस्त; पुणे दिल्ली सल्तनतीच्या अधिपत्याखाली
- इ.स. १३२८तुघलकाचं पुण्यावर आक्रमण; कोंडाणा किल्ला जिंकला
इ.स. १६२५ सुमार – इ.स. १७०३
शिवकालीन पुणे
शहाजीराजे, जिजामाता आणि बालशिवाजी यांच्या आगमनानं पुण्याच्या इतिहासाला निर्णायक वळण मिळालं. आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव यानं जाळपोळ करून गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुण्याचं पुनर्वसन झालं; कसबा गणपतीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि लाल महाल उभा राहिला. प्राचीन व मध्ययुगीन काळात गाढवाचा नांगर फिरवणे हा अत्यंत क्रूर व राजकीय सूडबुद्धीचा प्रकार मानला जाई. परंतु, याच भूमीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा…
हा कालखंड पाहा- इ.स. १६२५ सुमारशहाजीराजांच्या ताब्यात पुणे परगणा आल्यानंतर सोमवार पेठ परिसरात वस्ती
- इ.स. १६३०-३१ सुमारआदिलशहाचा सरदार मुरार जगदेव याची स्वारी; पुण्यावर गाढवाचा नांगर
- इ.स. १६३०चं दशकराजमाता जिजाऊ यांच्याकडून पुण्याचं पुनर्वसन; पहिल्या पाच वर्षांची सारामाफी
- इ.स. १७०३औरंगजेबानं सिंहगड किल्ला जिंकून पुण्यात मुक्काम ठोकला
इ.स. १७१४पासून – इ.स. १८०३
पेशवेकालीन पुणे
पुढे पहिले बाजीराव पेशवे आणि नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पुणे ही मराठा साम्राज्याची राजधानी बनली. शनिवारवाडा, पेठांची रचना, वाडे, घाट, बागा, देवळं आणि जलव्यवस्थापन यांच्या माध्यमातून शहराला नियोजनबद्ध स्वरूप प्राप्त झालं.
हा कालखंड पाहा- इ.स. १७१४पासूनकसबा पेठेतल्या सरदार मुजुमदार वाड्यात गणेशोत्सव
- ११ मार्च १७२०चासच्या काशीबाईंचा थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी विवाह
- इ.स. १७२६पासूनपुणे मराठी राज्यकारभाराचं केंद्र बनू लागलं
- १० जानेवारी १७३०थोरले बाजीराव पेशवे यांच्या हस्ते शनिवारवाड्याची पायाभरणी
- इ.स. १७५०चं दशकनानासाहेब पेशव्यांची कात्रज ते शनिवारवाडा भूमिगत जलवाहिनी
१७ नोव्हेंबर १८१८ – इ.स. १८८४
ब्रिटिशकालीन पुणे
पुण्यात १८१८नंतर ब्रिटिश सत्तेखाली छावणी (कॅन्टोन्मेंट), शिक्षणसंस्था, आधुनिक नगररचना आणि सार्वजनिक पायाभूत सोयी विकसित झाल्या. स्वातंत्र्यानंतर उद्योग, शिक्षण, संशोधन आणि माहिती-तंत्रज्ञानामुळे शहराचा झपाट्यानं विस्तार झाला.
हा कालखंड पाहा- १७ नोव्हेंबर १८१८येरवड्याच्या लढाईनंतर शनिवारवाडा इंग्रजांच्या ताब्यात
- २१ फेब्रुवारी १८२८शनिवारवाड्याला सर्वांत भीषण आग; पंधरा दिवस धुमसत राहिली
- इ.स. १८३२बुधवारवाड्यात इंग्रजी शाळा सुरू
- इ.स. १८४८भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा
- इ.स. १८५१पासूनकेरो लक्ष्मण छत्रे यांच्याकडून वेधशाळेत हवेचा दाब आणि पावसाची शास्त्रीय नोंद
इ.स. १९०३पासून – इ.स. १९४६
स्वातंत्र्य चळवळीतील पुणे
इ.स. १८१८नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यावर पुण्यानं राजकीय विचारांच्या नव्या पर्वात प्रवेश केला. सत्तेचं केंद्र गमावलेल्या या शहरानं देशाला वैचारिक नेतृत्व दिलं. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी घटनात्मक सुधारणा, सामाजिक परिवर्तन आणि विवेकाधिष्ठित राष्ट्रवादाचा पाया घातला. गोपाळ कृष्ण गोखले यांनी उदारमतवादी लोकशाहीची विचारधारा देशभर पोचवली, तर लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा घोष करीत जनतेला राजकीय चळवळीत सक्रिय…
हा कालखंड पाहा- इ.स. १९०३पासूनपूना यंग क्रिकेट क्लब आणि युरोपीय क्लब यांच्यात प्रतिवार्षिक सामने
- इ.स. १९०६डेक्कन जिमखाना क्लबची स्थापना
- इ.स. १९०९किर्लोस्कर नाट्य मंदिर (आताचा वसंत सिनेमा) सुरू
- इ.स. १९१०वि.का. राजवाडे यांच्याकडून भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना
- १९ फेब्रुवारी १९१६डेक्कन सभेच्या निमंत्रणावरून महात्मा गांधींचं किर्लोस्कर नाट्य मंदिरात व्याख्यान
इ.स. १९४७ – इ.स. २००८
स्वातंत्र्योत्तर पुणे
स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षण, उद्योग आणि स्थलांतरामुळे पुण्याचं सामाजिक स्वरूप अधिक बहुविध झालं. देशाच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी पुण्याच्या सामाजिक पोतामध्ये भर घातली. सिंध आणि पंजाबमधून आलेल्या निर्वासितांनी उद्योग, व्यापार आणि उद्यमशीलतेची नवी संस्कृती रुजवली.
हा कालखंड पाहा- इ.स. १९४७पंडिता रोहिणी भाटे यांच्याकडून ‘नृत्यभारती’ची स्थापना
- इ.स. १९४९पुणे विद्यापीठाची (सध्याचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) स्थापना
- इ.स. १९५३पासूनसवाई गंधर्व संगीत महोत्सवाची सुरुवात
- ६ फेब्रुवारी १९५६पुण्यात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना
- इ.स. १९५७हडपसर औद्योगिक वसाहतीला कारखान्यांसाठी जकातमाफी
इतिहासातली गोष्ट
पुण्यविषय ते पुणे
पुण्याचा पहिला उल्लेख असणारा लिखित पुरावा राष्ट्रकूट राजा कृष्णराज याच्या एका ताम्रपटातील शके ६८०च्या (इ.स. ७५८) दानलेखात आढळतो.
परंतु या सर्व नामरूपांत एक साधर्म्य आहे ते या नावातील ‘पुण्य’ या रूपाचं.
- पुण्यविषयइ.स. ७५८ · राष्ट्रकूट ताम्रपट
- पूनकविषयइ.स. ७६८ सुमार
- पुणकविषयइ.स. ९९३ · शिलाहार ताम्रपट
- कसबे पुणेनिजामशाही आणि शिवकाळ
- पुणेआजचं नावरूप
पुणे घडवणारी माणसं
छत्रपती शिवाजी महाराज
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि दूरदर्शी राष्ट्रनिर्माते. पुण्यातील बालपण, लाल महाल आणि स्वराज्यस्थापनेची प्रारंभिक घडण.…
राजमाता जिजाऊ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता आणि स्वराज्याच्या मूल्यांची जडणघडण करणाऱ्या दूरदर्शी राष्ट्रमाता. इ.स. १६३०च्या दशकात…
महात्मा जोतीराव फुले
समाजसुधारक, विचारवंत आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक. स्त्रीशिक्षण, शूद्र-अतिशूद्रांचं शिक्षण आणि सामाजिक समतेसाठी आयुष्य…
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका आणि स्त्रीशिक्षण चळवळीच्या अग्रणी. पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा…
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
स्वराज्याचे प्रखर पुरस्कर्ते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे लोकनेते. स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि सार्वजनिक उत्सवांच्या…
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी
किराणा घराण्याचे प्रख्यात गायक. शास्त्रीय संगीताचा ध्यास घेऊन वयाच्या अकराव्या वर्षी घराचा त्याग. १९४६मध्ये सवाई…
रंग पुणेरी, ढंग पुणेरी
पुण्याच्या वाटचालीला आकार देणारी रंगतदार वळणं, विस्मयकारक घटनाक्रम आणि रंजक किस्से. सर्व लेख
धोतर घालून क्रिकेट खेळताना तुम्ही कुणाला पाहिलं आहे?
धोतर-टोपीतलं क्रिकेट
लेख वाचानाव स्वारगेट, पण तिथं गेट दिसत नाही, नाव हिराबाग, पण तिथंही बाग दिसत नाही... पुण्यातल्या ठिकाणांची ही नावं अशी कशी?
या बागा आणि गेट आहेत कुठं?
लेख वाचामहात्मा जोतीराव फुले हे केवळ महान समाजसुधारकच नव्हते, तर एक यशस्वी व्यावसायिक आणि आजच्या पुण्याचीही ओळख असणाऱ्या पायाभूत सोयींच्या भव्य प्रकल्पांचे कंत्राटदार होते, हे आपल्यापैकी काहींना कदाचित ठाऊक नसेल.
कंत्राटदार महात्मा फुले
लेख वाचातुम्हाला माहिती आहे का?
छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारण्यात आला आणि सुमारे शंभर वर्षं तो त्याच दिमाखात पुणेकरांना प्रेरणा देत आहे, हे तुम्हाला माहिती आहे?पुण्याच्या मध्यवर्ती भागातल्या या रस्त्यानं बांधकाम पूर्ण झाल्यापासून आजवर एकही खड्डा न पडता उत्तम गुणवत्तेचा एक अनोखा आणि अढळ आदर्श प्रस्थापित केला आहे.बॅडमिंटन हे त्याचं नाव... आणि हो, पुणे हेच या खेळाचं जन्मगाव!हिंजवडीतला राजीव गांधी इन्फोटेक पार्क आज ज्या जागेवर उभा आहे, तिथं खरं तर एक साखर कारखाना उभा राहणार होता, हे आपल्याला माहिती आहे?पुण्याचा वारसा
शनिवारवाडा
आज पुण्याच्या मध्यभागी उभा असलेला हा शनिवारवाडा म्हणजे एकेकाळी मराठा साम्राज्याचं धगधगतं सत्ताकेंद्र होतं.
सांस्कृतिक पुणे
शिक्षण
विद्येचं माहेरघर
पुणे विद्यापीठाच्या (सध्याचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) स्थापनेनंतर (१९४९) या शहरातलं उच्च शिक्षण, संशोधन आणि व्यावसायिक शिक्षणाला नवं अधिष्ठान मिळालं.
- १८४८भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा
- १८५४शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
- १९४९पुणे विद्यापीठ
क्रीडा
क्रीडानगरी
जगभर लोकप्रिय असणाऱ्या आणि अलीकडील काही दशकांत भारतीय खेळाडूही चमकदार कामगिरी करत असलेल्या बॅडमिंटन या खेळाची पुणे ही जन्मभूमी.
- १८६०चं दशक‘पूना गेम्स’
- १९०६डेक्कन जिमखाना
- १९९४राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, बालेवाडी
विज्ञान · तंत्रज्ञान
विज्ञान-तंत्रज्ञान आणि आधुनिक पुणे
स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय संशोधन संस्था, संरक्षण आस्थापना आणि औद्योगिक विकास यांच्या एकत्रित प्रभावातून पुणे हे देशातलं अग्रगण्य विज्ञाननगरी व संरक्षण केंद्र म्हणून विकसित झालं.
- १८५१पासूनकेरो छत्रे यांच्या हवामान नोंदी
- १९४६किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, खडकी
- परमभारताचा पहिला सुपरकॉम्प्युटर
नकाशावरचं पुणे
नकाशावरील एखादी खूण निवडा.
चित्रांतून पुणे
निवडक लेख
पुण्याच्या पेठांचा इतिहास
पुण्यातल्या पेठा हा कुणासाठी अभिमानाचा, तर कुणासाठी कुत्सित टोमण्यांचा विषय. वास्तविक, या पेठांचं स्वरूप आणि लोकसंख्येची रचना यांत विसाव्या शतकाच्या…
वसंत सिनेमात गांधीजी
एकेकाळी पुण्यातली चित्रपट आणि नाट्य गृहं हीदेखील काही गाजलेल्या व्याख्यानांसाठीची व्यासपीठं होती, हे कधी तुमच्या कानावर पडले होते? नाही ना? मग, अशाच…
एका संग्रहालयाची गोष्ट
पुण्यातल्या घोले रस्त्यावरच्या महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाची वाटचाल ही तिथल्या वस्तुसंग्रहाएवढीच अचंबित करणारी आहे. एका प्रदर्शनातून झालेली त्याची…
सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ
गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातला मानबिंदू आणि त्याचं सार्वजनिक रूप हे या धार्मिक-सांस्कृतिक आविष्कारातून प्रबोधन साधण्यासाठीची चळवळ.
बॅडमिंटनची जन्मभूमी
तुम्हाला पूना गेम माहिती आहे? नावावरून अंदाज आलाच असेल, की या खेळाचं पुण्याशी पक्कं नातं आहे. आज या नावानं कुठलाच खेळ खेळला जात नाही. परंतु हा खेळ…
साखर कारखान्याच्या जागी आयटी हब
हिंजवडीतला राजीव गांधी इन्फोटेक पार्क आज ज्या जागेवर उभा आहे, तिथं खरं तर एक साखर कारखाना उभा राहणार होता, हे आपल्याला माहिती आहे? ज्या गगनचुंबी…