कालखंड · इ.स. १७१४पासून – इ.स. १८०३
पेशवेकालीन पुणे

पुढे पहिले बाजीराव पेशवे आणि नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पुणे ही मराठा साम्राज्याची राजधानी बनली. शनिवारवाडा, पेठांची रचना, वाडे, घाट, बागा, देवळं आणि जलव्यवस्थापन यांच्या माध्यमातून शहराला नियोजनबद्ध स्वरूप प्राप्त झालं. पेशव्यांच्या काळात पुणे मराठा साम्राज्याची राजधानी बनली आणि शहराचा सामाजिक विस्तार वेगानं झाला. विविध पेठा वसल्या, कारागीर, व्यापारी, विद्वान, सैनिक आणि कलाकार यांची मोठी वस्ती इथं निर्माण झाली. मंदिरं, घाट, वाडे, उत्सव आणि धार्मिक परंपरांमुळे सामाजिक जीवन समृद्ध; परंतु जातिव्यवस्था आणि सामाजिक विषमता याही त्याच काळात अधिक दृढ झाल्या. पेशवेकालीन पुणे हे या प्रवासातलं पहिलं मोठं आर्थिक स्थित्यंतर होतं. १७२०नंतर पेशवाईचं राजकीय महत्त्व वाढलं आणि १७२६पासून पुणे मराठी राज्यकारभाराचं केंद्र बनू लागलं. मराठी सत्तेचा विस्तार होताच विविध प्रदेशांतील व्यापारी, सावकार आणि कारागीर पुण्यात येऊन स्थायिक झाले. पेठांची वाढ, बाजारपेठांचा विस्तार आणि वाडे, कारखाने व कारागिरीच्या केंद्रांची निर्मिती यांमुळे पुणे आर्थिक सत्ताकेंद्र बनलं.
मजकूर: ‘पुणेरी’ विभागातील ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वाटचालीमधून.
या कालखंडातील नोंदी
या कालखंडातील लेख
शनिवारवाड्याचं भव्य रूप
एखाद्या वास्तूच्या आजच्या भग्नावस्थेवरून तिच्या इतिहासातल्या भव्यतेचा अंदाज करता येणं तसं कठीणच. त्यातही त्या वास्तूचं नाव शनिवारवाडा असेल आणि…
काशीबाईंचं माहेर
२०१५मध्ये प्रदर्शित झालेला ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट आठवतो? तोच तो, ज्यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं काशीबाई हे थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या…
ऐतिहासिक जलव्यवस्थापन
पाणीपुरवठा हा पुण्यासाठी नेहमीच चर्चेचा आणि शहराच्या स्वास्थ्याचा विषय राहिला आहे! छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यासाठीचा पहिला प्रयत्न…
शनिवारवाड्याच्या आगी
पुण्याच्या इतिहासात शनिवारवाडा हा केवळ पेशव्यांच्या सत्तेचं प्रतीक नाही, तर वैभव, विजय, राजकारण, कारस्थानं आणि काही दुर्दैवी घटनांचा मूक साक्षीदारही…
पुण्याच्या पेठांचा इतिहास
पुण्यातल्या पेठा हा कुणासाठी अभिमानाचा, तर कुणासाठी कुत्सित टोमण्यांचा विषय. वास्तविक, या पेठांचं स्वरूप आणि लोकसंख्येची रचना यांत विसाव्या शतकाच्या…
लकडी पूल
पुण्याच्या मध्यवस्तीतून वाहणारी मुठा नदी या शहराची पूर्व-पश्चिम अशी विभागणी करत पुढे जाते. ही विभागणी केवळ भौगोलिक नव्हे, तर सांस्कृतिकही मानली जाते.…
या कालखंडातील व्यक्ती
सर्व व्यक्तीया कालखंडातील स्थळे
शनिवारवाडा
आज पुण्याच्या मध्यभागी उभा असलेला हा शनिवारवाडा म्हणजे एकेकाळी मराठा साम्राज्याचं धगधगतं सत्ताकेंद्र होतं.
नाना पेठ
नाना फडणवीस यांच्या नावावरून नाना पेठ, नारायणराव पेशवे यांच्या स्मरणार्थ नारायण पेठ, तर पेशव्यांच्या सरदारांच्या नावावरून रास्ता पेठ ओळखली जाऊ लागली.
लकडी पूल
१७६१मध्ये पानिपतच्या युद्धानंतर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी तो बांधला.
भाऊ महाराज बोळ
तुळशीबागेपासून बाजीराव रस्त्याला समांतर जाणारा हा अरुंद बोळ गेली दोनशे वर्षं जवळजवळ त्याच नावानं ओळखला जातो.
हिराबाग
नाव स्वारगेट, पण तिथं गेट दिसत नाही, नाव हिराबाग, पण तिथंही बाग दिसत नाही... पुण्यातल्या ठिकाणांची ही नावं अशी कशी?
कात्रज जलवाहिनी
पुढे पेशव्यांच्या काळात पुण्यात १७५०च्या दशकात नानासाहेब पेशव्यांनी कात्रज तलावातून शनिवारवाड्यापर्यंत पाणी आणण्यासाठी एक भूमिगत जलवाहिनी योजना…