सारसबाग
तळ्यातला गणपती
ठळक माहिती
- मंदिराची उभारणी
- १७८४, श्रीमंत सवाई माधवराव पेशवे
- पेशवेकालीन तलाव
- सुमारे २५ एकर
- मधलं बेट
- सुमारे २५,००० चौरस फूट
- जागेचं हस्तांतरण
- १८६१, इंग्रज सरकारकडून
- प्रकार
- मंदिरे व देवस्थानं
- कालखंड
- पेशवेकालीन पुणे
- परिसर
- पुणे शहर
इतिहास
आजच्या सारसबागेचं स्वरूप पेशवेकाळापेक्षा पूर्णतः वेगळं आणि आटोपशीर असलं, तरी त्याकाळी ही बाग पर्वती तलावाचा एक भाग होती. ओढ्याचा प्रवाह वळवल्यानंतर, भविष्यातील पाण्याची गरज ओळखून पेशव्यांनी पर्वतीच्या पायथ्याशी सुमारे २५ एकर क्षेत्रावर एक कृत्रिम तलाव खोदला होता. हाच तो ऐतिहासिक तलाव, ज्याच्या मधोमध आजची सारसबाग आणि सणस मैदान उभं आहे. तलाव खोदताना तिथं अनेक नैसर्गिक झरे लागल्यानं त्यात वर्षभर पाण्याचा मोठा साठा उपलब्ध असे. तलाव खोदताना पेशव्यांनी त्याच्या मध्यभागी सुमारे २५,००० चौरस फुटांचं एक कृत्रिम बेट राखून ठेवून त्यावर एक सुंदर बाग विकसित केली.
मजकूर: ‘तळ्यातला गणपती’ (रंग पुणेरी) या लेखातून.
संबंधित लेख
ऐतिहासिक जलव्यवस्थापन
पाणीपुरवठा हा पुण्यासाठी नेहमीच चर्चेचा आणि शहराच्या स्वास्थ्याचा विषय राहिला आहे! छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यासाठीचा पहिला प्रयत्न…
राजकीय सभांचं व्यासपीठ
तिरकसपणासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणेकरांची भाषण आणि संभाषण कला हा मतमतांतरांचा विषय ठरू शकतो. परंतु हेच पुणेकर उत्तम श्रोतेही आहेत, याविषयी मतमतांतरं…
चित्रसंग्रह
संबंधित घटना
कालरेषायाच प्रकारची इतर स्थळे
आळंदी
त्यांच्यामुळे आळंदी–पुणे परिसराला अध्यात्म, समता आणि लोकधर्माचं चिरंतन सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रतिष्ठा.
देहू
देहू ही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी राहिली.
कस्तुरे चौक विठ्ठल मंदिर
या कस्तुरे चौक विठ्ठल मंदिराच्या जवळच तुकाराम महाराजांची सासुरवाडी म्हणजे गुळवे सावकार यांचं घर होतं.