पेठा
वारसा, शिक्षण, क्रीडा आणि उद्योगाशी जोडलेली स्थळे. प्रकार, कालखंड किंवा परिसरानुसार निवडा.
कसबा पेठ
पुण्याची सर्वांत जुनी वस्ती म्हणजे कसबा पेठ. शिवपूर्वकाळापासून या भागात वस्ती होती.
सोमवार पेठ
त्यानंतरची वस्ती शहाजीराजांच्या ताब्यात पुणे परगणा आल्यानंतर आजच्या सोमवार पेठ परिसरात (इ.स. १६२५च्या सुमारास) झाली.
शनिवार पेठ
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील निळोपंत मुजुमदार यांनी शुक्रवार व रविवार पेठा वसवल्या, तर मोरोपंत पिंगळे यांनी शनिवार पेठ.
बुधवार पेठ
भवानी व घोरपडे या पेठा संभाजी महाराजांच्या कार्यकाळात वसवण्यात आल्या, तर बुधवार पेठ औरंगजेबानं वसवून तिला सुरुवातीला मुहिताबाद असं नाव दिलं.
नाना पेठ
नाना फडणवीस यांच्या नावावरून नाना पेठ, नारायणराव पेशवे यांच्या स्मरणार्थ नारायण पेठ, तर पेशव्यांच्या सरदारांच्या नावावरून रास्ता पेठ ओळखली जाऊ लागली.
सेनादत्त (नवी) पेठ
त्याला अपवाद सेनादत्त (नव्या) पेठेचा. ती पानशेत धरणफुटीनंतर पुण्यातील पूरग्रस्तांसाठी वसवण्यात आली.
या निवडीसाठी स्थळ नाही. फिल्टर बदलून पाहा.