उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान
मुळा-मुठेच्या खोऱ्यात वसलेलं पुणे हे इतिहासकाळापासून दख्खनचं पठार आणि कोकण यांना जोडणाऱ्या मार्गांवरील एक महत्त्वाचं स्थान राहिलं आहे. त्यामुळे त्याची आर्थिक वाटचाल ही केवळ शेती किंवा स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित न राहता, बदलत्या राजकीय सत्तांबरोबर व्यापार, कारागिरी, प्रशासन, उद्योग आणि आधुनिक सेवा क्षेत्रांपर्यंत विस्तारत गेली.
आर्थिक वाटचाल
उद्योगाचे शिल्पकार
काकासाहेब गाडगीळ
स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री. स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्योत्तर राष्ट्रनिर्मितीत…
सरदार दोराबजी पदमजी
पुणे नगरपालिकेचे १८८७पासून १९०२पर्यंत १६ वर्षं अध्यक्ष. शास्त्रीय संशोधनाकडे कल. त्यातूनच १८८४मध्ये बंधू नवरोसजी यांच्या…
धनंजयराव गाडगीळ
अर्थ आणि सहकार क्षेत्रातले अग्रगण्य विचारवंत आणि मार्गदर्शक. गोखले अर्थशास्त्र संस्थेचे संस्थापक आणि संचालक म्हणून…
आत्माराम रावजी भट
महाराष्ट्राच्या उद्योगविश्वाचे शिल्पकार. १९३४मध्ये पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना करण्यात…
शंतनुराव किर्लोस्कर
पुणे शहराला भारताची औद्योगिक राजधानी आणि मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यात अत्यंत मोलाचं व पायाभूत योगदान. १९४६मध्ये खडकीत…
नवलमल फिरोदिया
स्वातंत्र्यसेनानी, द्रष्टे उद्योगपती आणि भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्राचे शिल्पकार. फोर्स मोटर्स (तत्कालीन बजाज टेंपो) या…
राहुल बजाज
बजाज समूहाला जागतिक पातळीवर नेणारे आणि भारताच्या वाहनउद्योग क्षेत्राचे आधुनिकीकरण करणारे उद्योगपती. लोकप्रिय दुचाकी…
डॉ. सायरस पूनावाला
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक. जगातल्या सर्वांत मोठ्या लस उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जागतिक आरोग्य क्षेत्रात…
बाबा कल्याणी
भारत फोर्जचे अध्यक्ष. त्यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फोर्जिंग कंपनी. पुण्याच्या…
कैलास व संजय काटकर
क्विक हील या भारतातल्या सर्वांत लोकप्रिय व अग्रगण्य सायबर सुरक्षा कंपनीचे संस्थापक बंधुद्वय. कौटुंबिक परिस्थितीमुळे…
आर्थिक-औद्योगिक संस्था
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या आणि आजही कार्यरत संस्थांचा समावेश या यादीत केला आहे.
दोराबजी अँड सन्स
कॅम्प भागात सोराबजी दोराबजी यांनी सुरू केलेलं हे पुण्यातलं सर्वांत जुनं आणि भारतातलं दुसरं जुनं पारशी रेस्टॉरंट आहे. सुरुवातीला चहा आणि बनमस्का विकणाऱ्या या दुकानात आज अस्सल पारशी जेवणासाठी गर्दी होते.
डेक्कन पेपर मिल्स
पुण्याच्या जुन्या औद्योगिक इतिहासातलं हे महत्त्वाचं नाव आहे. भारतीय उद्योजकांनी काढलेली ही देशातली कागदाची पहिली गिरणी होती.
कॉसमॉस सहकारी बँक
एक पतसंस्था म्हणून स्थापन झालेली, भारतातील ही सर्वांत जुन्या आणि अग्रगण्य सहकारी बँकांपैकी एक आहे. देशातल्या सात राज्यांत ती विस्तारली असून, तिच्या जवळपास दोनशे शाखा आहेत.
वैद्य उपाहारगृह
कोकणातून पुण्यात आलेले रघुनाथ रामचंद्र वैद्य यांनी या उपाहारगृहाची सुरुवात केली. पुण्यात मिसळ विकायला सुरुवात करणारं हे पहिलं उपाहारगृह मानलं जातं.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
पुणे जिल्ह्यातल्या सहकार आणि ग्रामीण वित्तव्यवस्थेच्या विकासात या संस्थेचं दीर्घकाळ योगदान राहिलं आहे. आजदेखील ही बँक पुणे जिल्ह्यातल्या शेतकरी आणि सहकारी संस्थांचा आधारस्तंभ म्हणून सशक्तपणे कार्यरत आहे.
बादशाही बोर्डिंग हाउस
टिळक रस्त्यावरच्या या खानावळीची सुरुवात १९३२मध्ये झाली. अस्सल, घरगुती आणि सात्त्विक महाराष्ट्रीय शाकाहारी थाळीसाठी हे ठिकाण आजही प्रसिद्ध आहे.
व्यापार आणि बाजारपेठा
शिवपूर्वकालीन व शिवकालीन पुणे हा प्रामुख्यानं स्थानिक बाजारपेठेभोवती विकसित झालेलं कृषिप्रधान कसबा होता. पंचक्रोशीतले शेतकरी, वाणी-उदमी आणि कारागीर यांची इथं नियमित ये-जा असे. कोकण-मावळातून मीठ, तांदूळ आणि अन्य जीवनावश्यक वस्तू पुण्यात येत; स्थानिक गरजा भागवणारी कारागिरी आणि किरकोळ व्यापार हे अर्थव्यवस्थेचे प्रमुख आधार होते. पुढे ते शहाजीराजे व शिवाजी महाराजांच्या जहागिरीचं ठाणं झाल्यामुळे त्याचं लष्करी-प्रशासकीय महत्त्व वाढलं. परिणामी व्यापारी व सावकारांची वर्दळ वाढली.
पेशवेकालीन पुणे हे या प्रवासातलं पहिलं मोठं आर्थिक स्थित्यंतर होतं. १७२०नंतर पेशवाईचं राजकीय महत्त्व वाढलं आणि १७२६पासून पुणे मराठी राज्यकारभाराचं केंद्र बनू लागलं. मराठी सत्तेचा विस्तार होताच विविध प्रदेशांतील व्यापारी, सावकार आणि कारागीर पुण्यात येऊन स्थायिक झाले. पेठांची वाढ, बाजारपेठांचा विस्तार आणि वाडे, कारखाने व कारागिरीच्या केंद्रांची निर्मिती यांमुळे पुणे आर्थिक सत्ताकेंद्र बनलं.
ब्रिटिशकाळात पुण्याच्या अर्थव्यवस्थेनं पारंपरिक बाजारपेठेपासून आधुनिक नागरी अर्थव्यवस्थेकडे वाटचाल केली. लष्करी छावणी, रेल्वे, शिक्षणसंस्था, सरकारी कार्यालयं आणि नव्या नागरी सोयींमुळे रोजगार व सेवाक्षेत्र वाढलं. मुद्रण, प्रकाशन, शिक्षण आणि सार्वजनिक संस्थांच्या वाढीनं ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेची पायाभरणी झाली.
कंत्राटदार महात्मा फुले
महात्मा जोतीराव फुले हे केवळ महान समाजसुधारकच नव्हते, तर एक यशस्वी व्यावसायिक आणि आजच्या पुण्याचीही ओळख असणाऱ्या पायाभूत सोयींच्या भव्य प्रकल्पांचे…
शेतकऱ्यांची रिअल इस्टेट कंपनी
शेतकऱ्यांची मालकी, त्यांचं सभासदत्व किंवा त्यांच्याकडे समभाग असणाऱ्या सहकारी संस्था ही कल्पना आता काही नवी राहिलेली नाही. परंतु या संस्थांचा उद्देश…
औद्योगिक पुणे
स्वातंत्र्योत्तर पुण्यानं मात्र औद्योगिकीकरणाची झेप घेतली. मात्र, त्यातही या शहराची तोवरची प्रतिमा आणि राज्यकर्ते व प्रशासकांचा दृष्टिकोन यांचा बहुधा अडसर ठरला असावा. खुद्द उद्योगमहर्षि शंतनुराव किर्लोस्कर यांनी तसं भाष्य एका लेखात केलं आहे. किर्लोस्कर ऑइल इंजिन्स हा उद्योग १९४६मध्ये पुण्यात आला त्या सुमारास पुण्यात कारखानदारीला पूरक वातावरण नव्हतं; पुणे हा शिक्षण व पेन्शनरांचा स्वर्ग आहे, त्याचा नरक होईल, अशी भीती खुद्द तत्कालीन कलेक्टरांनी व्यक्त केली होती, अशी आठवण शंतनुरावांनी या लेखात लिहिली आहे. त्याही स्थितीत पुण्यात कारखाने वाढू लागल्यावर ते पिंपरीत जाऊ देत, अशी चळवळ सुरू झाल्याचाही या लेखात उल्लेख आहे.
परंतु, याही स्थितीमध्ये पुण्याची औद्योगिक वाढ होत राहिली. १९५७मध्ये हडपसर औद्योगिक वसाहतीला कारखाने आकर्षित करण्यासाठी जकातमाफी देण्यात आली; त्यातून किर्लोस्कर न्यूमॅटिक, हेनले केबल्स, इंडियन ह्यूम पाइप यासारखे उद्योग आले. १९६०च्या दशकात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं भोसरीत चार हजार एकर जागा विकसित केली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसर ही उद्योगनगरी म्हणून आकार घेऊ लागली. टेल्को (सध्याची टाटा मोटर्स), बजाज ऑटो, सेंच्युरी एन्का, फिलिप्स, सँडविक एशिया आदी उद्योग त्या परिसरात उभे राहिले आणि पुणे देशातलं महत्त्वाचं ऑटोमोबाइल व इंजिनिअरिंग केंद्र बनलं.
लेख
औद्योगिक पुण्याचं गमक
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आर्थिक-औद्योगिक आघाडीवर पुण्यानं जे परिवर्तन अनुभवलं, त्याविषयीची निरीक्षणं उद्योगमहर्षि शंतनुराव किर्लोस्कर यांनी एका…
रिक्षाची जन्मकथा
पुणे आणि रिक्षा यांचं नातं काय, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक पुणेकराच्या दृष्टीनं वेगवेगळं असू शकतं. ‘पुण्यात जेवढ्या रिक्षा तेवढी मतं,’ असंही काहीसं…
वाहन उद्योग
शंतनुराव किर्लोस्कर
पुणे शहराला भारताची औद्योगिक राजधानी आणि मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यात अत्यंत मोलाचं व पायाभूत योगदान. १९४६मध्ये खडकीत…
नवलमल फिरोदिया
स्वातंत्र्यसेनानी, द्रष्टे उद्योगपती आणि भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्राचे शिल्पकार. फोर्स मोटर्स (तत्कालीन बजाज टेंपो) या…
राहुल बजाज
बजाज समूहाला जागतिक पातळीवर नेणारे आणि भारताच्या वाहनउद्योग क्षेत्राचे आधुनिकीकरण करणारे उद्योगपती. लोकप्रिय दुचाकी…
अभियांत्रिकी उद्योग
किर्लोस्कर, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, थरमॅक्स, भारत फोर्ज यासारख्या उद्योगसमूहांनी अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्राचा पाया मजबूत केला.
बाबा कल्याणी
भारत फोर्जचे अध्यक्ष. त्यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फोर्जिंग कंपनी. पुण्याच्या…
अनू आगा
पुणे स्थित थरमॅक्स या अभियांत्रिकी कंपनीचं नेतृत्व करताना ऊर्जा, पर्यावरण आणि शाश्वत औद्योगिक उपाययोजनांना चालना. कठीण…
IT पुणे
यानंतर पुण्याची अर्थव्यवस्था ऑटोमोबाइल व अभियांत्रिकीपलीकडे फार्मास्युटिकल्स, माहिती-तंत्रज्ञान, संरक्षण उद्योग आणि सेवाक्षेत्रांमध्ये विस्तारली. विसाव्या शतकाच्या शेवटी पुण्याच्या सॉफ्टवेअर क्षेत्राला मिळालेली मोठी गती हा त्यातला सर्वांत महत्त्वाचा परिवर्तनाचा टप्पा ठरला. बेंगळुरूच्या खालोखाल पुण्याला महत्त्व आलं. हिंजवडीत सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क सुरू करण्यात आलं. भारताचा पहिला सुपरकॉम्प्युटर ‘परम’ पुण्यातच तयार झाला. आज हिंजवडी, मगरपट्टा सिटी, खराडी आणि येरवडा या भागांत पुण्यातील आयटी उद्योग भरभराटीला आला आहे.
शिक्षण आणि उद्योग यांच्या संगमातून पुण्यानं आधुनिक तंत्रज्ञाननगरी म्हणूनही ओळख निर्माण केली. किर्लोस्कर, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, थरमॅक्स, भारत फोर्ज यासारख्या उद्योगसमूहांनी अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्राचा पाया मजबूत केला. माहिती तंत्रज्ञानाच्या विस्तारानंतर हिंजवडी आयटी पार्क, खराडी, मगरपट्टा आणि तळवडे परिसरात बहुराष्ट्रीय कंपन्या व तंत्रज्ञान उद्योग उभे राहिले. सॉफ्टवेअर, ऑटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि स्टार्टअप परिसंस्थेमुळे पुणे हे देशातल्या प्रमुख तंत्रज्ञान केंद्रांपैकी एक बनलं. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस, टेक महिंद्रा, विप्रो, कॅपजेमिनी, ॲमडॉक्स, ॲक्सेंच्युअर, कॉग्निझंट, सिमेन्स अशा सर्व नावाजलेल्या कंपन्यांनी पुण्यातही विस्तार केला. पर्सिस्टंट सिस्टीम्सनं तर पुण्यातूनच सुरुवात करून जगभर व्यवसायाचं जाळं विणलं. या सर्वांमुळे पारंपरिक उद्योग आणि डिजिटल अर्थव्यवस्था यांचा यशस्वी मेळ घालणारं शहर म्हणून पुण्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
लेख
Startup Pune
विविध आयटी केंद्रं, शैक्षणिक आणि संशोधन संस्था यांच्या बळावर आज पुणे औद्योगिक वारसा, तंत्रज्ञान, ज्ञान आणि नवउद्योजकता यांची सांगड घालणारं बहुआयामी आर्थिक महानगर म्हणून उभं आहे. कुशल मनुष्यबळाला मागणी आणि सेवाक्षेत्राचा विस्तार यांमुळे हे महानगर तरुणाईसाठी आकर्षणबिंदू ठरला आहे.
पाठोपाठ, अनेक नाणावलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची जागतिक क्षमताविकास केंद्रंदेखील पुण्यात येऊ लागली. त्यात तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रांतील एनव्हिडिया, सिमेन्स, कनिन्स अशा कंपन्या तर आहेतच; खेरीज वाहन व अभियांत्रिकी उद्योगांतील मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू, फोक्सवॅगन, जनरल मोटर्स अशा जगातील आघाडीच्या कंपन्याही आल्या. बँकिंग, वित्त व व्यवसाय सेवाक्षेत्रांतल्याही सिटी ग्रुप, ट्रान्स युनियन यांनी पुण्याची निवड केली. देशभरातल्या क्षमताविकास केंद्रांपैकी दहा टक्क्यांहून अधिक केंद्रं आता पुण्यात आहेत आणि त्यातून तंत्रकुशल रोजगारनिर्मितीही साधारणतः त्याच प्रमाणात झाली आहे.
स्टार्टअप परिसंस्थेसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे.
विज्ञान
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यानं विज्ञान, तंत्रज्ञान आणि संरक्षण या क्षेत्रांतही देशपातळीवर महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलं आहे. सामाजिक प्रबोधन, शिक्षण आणि संशोधन यांची भक्कम परंपरा लाभलेल्या या शहरात ब्रिटिशकाळापासून ज्ञाननिर्मितीची केंद्रं उभी राहू लागली. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय संशोधन संस्था, संरक्षण आस्थापना आणि औद्योगिक विकास यांच्या एकत्रित प्रभावातून पुणे हे देशातलं अग्रगण्य विज्ञाननगरी व संरक्षण केंद्र म्हणून विकसित झालं.
डॉ. जयंतराव नारळीकर आणि डॉ. रघुनाथराव माशेलकर यांच्यासारखे जागतिक कीर्तीचे संशोधक आणि त्यांच्या लेखन-वक्तृत्वकलेतून सहजसोप्या शब्दांत उलगडा होणारं विज्ञान समजून घेण्याची संधी पुणेकरांना मिळाली. डॉ. हरी विजय (एच.जे.) अर्णीकर, प्रा. वि.ग. भिडे, डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वैज्ञानिकांच्या नेतृत्व व अध्यापनाचा लाभ सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळाला.
विज्ञानाचे शिल्पकार
प्रा. केरो लक्ष्मण छत्रे
गणितज्ञ, ज्योतिषशास्त्रज्ञ आणि सृष्टिशास्त्रज्ञ. केरोनाना नावानं सर्वश्रुत. ‘ग्रहसाधनाची कोष्टके’ हा त्यांचा सर्वाधिक…
प्रा. शंकर पुरुषोत्तम आघारकर
वनस्पतींवर अपार प्रेम करणारा वैज्ञानिक. पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेचे (तेव्हाची महाराष्ट्र असोसिएशन फॉर दि…
डॉ. वसंत गोवारीकर
भारतातील अग्रगण्य अंतराळ वैज्ञानिक आणि हवामानशास्त्रज्ञ. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) सॉलिड प्रपल्शन क्षेत्रात…
डॉ. जयंतराव नारळीकर
खगोलशास्त्रज्ञ आणि विख्यात शास्त्रज्ञ. पुण्यातल्या ‘आयुका’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेचे संस्थापक. आपले गुरू…
डॉ. रघुनाथ माशेलकर
जागतिक कीर्तीचे रसायनशास्त्रज्ञ. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) संचालक आणि वैज्ञानिक व औद्योगिक…
डॉ. विजय भटकर
भारताच्या पहिल्या ‘परम’ या महासंगणकाचे मुख्य शिल्पकार. अमेरिकेने भारताला महासंगणक पुरवण्यास नकार दिल्याच्या…
संशोधन
ब्रिटिशकाळात स्थापन झालेलं फर्ग्युसन महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इतर शिक्षणसंस्थांनी तंत्र-वैज्ञानिक शिक्षणाचा पाया घातला. स्वातंत्र्यानंतर पुण्यात आघारकर संशोधन संस्था, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम), राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), आयुका (इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स), भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसर), राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र यासारख्या जागतिक दर्जाच्या संस्था उभ्या राहिल्या. खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, हवामानशास्त्र, पर्यावरण आणि मूलभूत विज्ञानातल्या संशोधनामुळे पुण्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. एकविसाव्या शतकात स्टार्टअप, नवसंशोधन आणि उद्योग-संशोधन सहकार्यामुळे ही वैज्ञानिक परंपरा अधिक बळकट झाली.
विज्ञान क्षेत्रातील संस्था
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या आणि आजही कार्यरत संस्थांचा समावेश या यादीत केला आहे.
केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस)
मुंबई प्रांताचा ‘स्पेशल इरिगेशन सेल’ म्हणून या केंद्राची स्थापना झाली. जलसंपदा विकास, जलविद्युत प्रकल्प, पूरनियंत्रण, धरणं आणि सागरी बंदरांच्या संरचनेसाठी तांत्रिक सल्ला व मॉडेल-आधारित संशोधन पुरवणं हे या केंद्राचं कार्यक्षेत्र आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग
या विभागाची स्थापना १८७५मध्ये झाल्यानंतर सुरुवातीला त्याचं कार्यालय कोलकात्यात आणि नंतर सिमल्यात होतं. तिथून ते पुण्यात हलवल्यामुळे त्याला ‘सिमला ऑफिस’ असंही म्हटलं जातं. हवामानाचा अभ्यास व त्याआधारित अंदाज वर्तवण्याचं काम हे कार्यालय करतं.
आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट
महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स म्हणून सुरू झालेल्या वैज्ञानिक संशोधनाच्या उपक्रमातून आघारकर संस्थेची निर्मिती झाली. वनस्पतिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जनुकशास्त्र, कवकशास्त्र आणि नॅनो जैवतंत्रज्ञान या विषयांवर इथं संशोधन केलं जातं.
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल)
डॉ. रघुनाथ माशेलकर संचालक
आयुका
डॉ. जयंतराव नारळीकर संस्थापक
आयसर
भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था
आयआयटीएम
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था
राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र
सी-डॅक
डॉ. विजय भटकर संस्थापक-कार्यकारी संचालक; ‘परम’ महासंगणक
तंत्रज्ञान
महादेव बल्लाळ नामजोशी
एकोणिसाव्या शतकातले द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योजक. लोकमान्य टिळकांचे समकालीन. औद्योगिक व तांत्रिक प्रगतीची गरज ओळखून…
रवी पंडित
केपीआयटी (कीर्तने-पंडित इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीज) या कंपनीचे सह-संस्थापक. या कंपनीद्वारे वाहन उद्योगासाठीची संगणकप्रणाली…
अनू आगा
पुणे स्थित थरमॅक्स या अभियांत्रिकी कंपनीचं नेतृत्व करताना ऊर्जा, पर्यावरण आणि शाश्वत औद्योगिक उपाययोजनांना चालना. कठीण…
प्रमोद चौधरी
प्राज इंडस्ट्रीज या पुणे स्थित कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष. जैवइंधन, औद्योगिक जैवतंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि शाश्वत…
आनंद देशपांडे
पुण्यात मुख्यालय असणाऱ्या पर्सिस्टंट सिस्टीम्स या भारतातल्या आघाडीच्या आयटी कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक.…
गणेश नटराजन
प्रसिद्ध तंत्रोद्योजक. ‘झेन्सार टेक्नॉलॉजीज’चे माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्याधिकारी. ‘५-एफ वर्ल्ड’ या डिजिटल…
पुणेरी शोध
वैज्ञानिक प्रगतीसाठीचा द्रष्टा
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा संपूर्ण भारत ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात खितपत पडला होता आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी भाषणं व आंदोलनं होत होती…
भरपुण्यात ‘सिमला ऑफिस’
‘पुणे तिथे काय उणे’ या उक्तीची प्रचीती पुरेशी आली नसेल, तर पुणेकरांनी आपल्या पोटात (भरवस्तीत) सामावून घेतलेल्या ‘सिमला ऑफिस’ची गोष्ट तुम्ही जाणून…
संरक्षण
पेशवेकालीन लष्करी परंपरेचा वारसा लाभलेल्या पुण्याला ब्रिटिशांनी दक्षिण विभागाच्या लष्करी मुख्यालयाचं स्वरूप दिलं. स्वातंत्र्यानंतर या परंपरेचा विस्तार होत राष्ट्रीय संरक्षण अकादमी, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डीआयएटी), संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) प्रयोगशाळा आणि लष्करी प्रशिक्षण केंद्रं इथं विकसित झाली. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी अधिकारी घडवणं, आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान विकसित करणं आणि लष्करी वैद्यकीय सेवा सक्षम करणं या क्षेत्रांत पुण्याचं योगदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.
संरक्षण क्षेत्रातील संस्था
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या आणि आजही कार्यरत संस्थांचा समावेश या यादीत केला आहे.
बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप
‘पायोनिअर लस्कर्स’ या नावानं या समूहाची स्थापना झाली. मात्र १८२०मध्ये त्यांचा सॅपर्स अँड मायनर्स म्हणून सैन्यात अधिकृत समावेश झाला. सैन्याला तांत्रिक व पायाभूत सुविधा पुरवणं हा या ग्रुपच्या स्थापनेचा मुख्य हेतू होता व आजही आहे.
कमांड हॉस्पिटल, वानवडी
ब्रिटिश मिलिटरी हॉस्पिटल म्हणून याची सुरुवात झाली. आज हे भारतीय लष्कराचं सर्वांत मोठं आणि प्रमुख सुपर-स्पेशालिटी रुग्णालय आहे. १०५ एकरांवर ते विस्तारलेलं असून २०२१मध्ये इथं एक हजारांहून अधिक खाटांचं पर्यावरणपूरक संकुल उभारण्यात आलं आहे.
दारूगोळा कारखाना, खडकी
भारतीय सशस्त्र दलांसाठी दारूगोळा आणि दारूगोळ्याचे घटक इथं तयार केले जातात. या कारखान्याची स्थापना ब्रिटिश काळात झाली असून तो देशाच्या सुरक्षा आणि संरक्षण स्वावलंबनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.
लष्कराचं दक्षिण विभाग मुख्यालय (सदर्न कमांड)
भारताच्या दक्षिण, पश्चिम आणि मध्य भागातील विशाल भूभागाचं, विस्तृत सागरी किनारपट्टीचं आणि राजस्थान व गुजरात सीमेवरील आंतरराष्ट्रीय सीमांचं रक्षण करण्यासाठी हा विभाग कार्यरत आहे.
उच्च ऊर्जा पदार्थ विज्ञान प्रयोगशाळा (एचईएमआरएल)
नैनितालमध्ये ‘केमिकल एक्झामिनर्स ऑफिस’ नावानं स्थापन झालेली ही प्रयोगशाळा १९६०मध्ये पुण्यात स्थलांतरित करण्यात आली. संरक्षण दलांसाठीच्या उच्च ऊर्जा सामग्रीचं संशोधन तिथं केलं जातं.
द क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट
मुंबईत स्थापन झालेली ही संस्था १९२२मध्ये खडकीत हलवण्यात आली. वैद्यकीय कारणांमुळे लष्करी सेवेतून अपात्र ठरणाऱ्या किंवा सेवा बजावताना अपंगत्त्व आलेल्या जवानांची शुश्रूषा व व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांचं सामाजिक पुनर्वसन इथं केलं जातं.
संरक्षण क्षेत्राचे शिल्पकार
जनरल अरुणकुमार वैद्य
भारतीय लष्कराचे तेरावे सेनाप्रमुख. १९६५ आणि १९७१मधल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धांतल्या कामगिरीसाठी महावीर चक्रानं…
जनरल मनोज मुकुंद नरवणे (निवृत्त)
भारतीय लष्कराचे अठ्ठाविसावे सेनाप्रमुख. वडील मुकुंद नरवणे हेदेखील भारतीय हवाई दलात विंग कमांडर. राष्ट्रीय संरक्षण…
लेफ्टनंट जनरल विनायकराव पाटणकर (निवृत्त)
पाकिस्तानविरुद्धच्या १९६५ व १९७१मधील युद्धांत सहभागी. दहशतवादी व पाकिस्तानी कारवाया मोठ्या प्रमाणात चालू असताना काश्मीर…
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त)
हवाई संरक्षण, प्रशिक्षण आणि संरक्षणविषयक धोरणांमध्ये उल्लेखनीय योगदान. १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात सक्रिय सहभाग.…
लेफ्टनंट जनरल डी.बी. शेकटकर (निवृत्त)
पुण्यात स्थायिक असलेले भारताचे प्रख्यात संरक्षण तज्ज्ञ. संरक्षणक्षेत्रातील सुधारणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या शेकटकर समितीचे…