समाजसुधारक, विचारवंत आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक. स्त्रीशिक्षण, शूद्र-अतिशूद्रांचं शिक्षण आणि सामाजिक समतेसाठी आयुष्य समर्पित. पुण्याला सामाजिक क्रांतीचं आणि समतेच्या विचारांचं राष्ट्रीय केंद्र बनवणारे प्रवर्तक.
नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.
महात्मा जोतीराव फुले
- कालावधी
- इ.स. १८२७–१८९०
- क्षेत्र
- समाजसुधारणा, शिक्षण
- कालखंड
- ब्रिटिशकालीन पुणे
जीवन आणि कार्य
समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक म्हणून पुण्याच्या शैक्षणिक परिवर्तनाला नवी दिशा. १८४८पासून पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्यानं मुलींसाठी आणि वंचित समाजघटकांसाठी शिक्षणाची दारं खुली. शिक्षण हा सामाजिक समतेचा पाया आहे, ही जाणीव पुण्याच्या सार्वजनिक जीवनात रुजवून आधुनिक, परिवर्तनशील पुण्याची पायाभरणी.
पुण्याशी नातं
संबंधित घटना
कालरेषासंबंधित स्थळे
बंडगार्डन पूल
१३ कमानी आणि आठशे फूट लांबीच्या या पुलाला आता वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.
भिडे वाडा
१८४८मध्ये पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या भिडे वाड्यात मुलींच्या पहिल्या शाळेद्वारे शिक्षणकार्याला सुरुवात; पुढे वंचितांसाठीही अनेक शैक्षणिक उपक्रम.
खडकवासला धरण
खडकवासला धरणाच्या बांधकामात ते कंत्राटदार होते. जे दोन हजार मजूर त्यांच्यासाठी काम करत त्यांच्यासाठी त्यांनी रात्रशाळा सुरू केली होती.
संबंधित लेख
राजकीय सभांचं व्यासपीठ
तिरकसपणासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणेकरांची भाषण आणि संभाषण कला हा मतमतांतरांचा विषय ठरू शकतो. परंतु हेच पुणेकर उत्तम श्रोतेही आहेत, याविषयी मतमतांतरं…
एका संग्रहालयाची गोष्ट
पुण्यातल्या घोले रस्त्यावरच्या महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाची वाटचाल ही तिथल्या वस्तुसंग्रहाएवढीच अचंबित करणारी आहे. एका प्रदर्शनातून झालेली त्याची…
तुम्ही नीलफलक वाचता का?
पुण्याच्या गल्लीबोळांतून, पेठांमधून फिरताना जुन्या वाड्यांच्या किंवा इमारतींच्या भिंतींवर निळ्या रंगाचे छोटे, गोलाकार पाटीवजा फलक आपल्या नजरेस पडतात.…
कंत्राटदार महात्मा फुले
महात्मा जोतीराव फुले हे केवळ महान समाजसुधारकच नव्हते, तर एक यशस्वी व्यावसायिक आणि आजच्या पुण्याचीही ओळख असणाऱ्या पायाभूत सोयींच्या भव्य प्रकल्पांचे…
याच क्षेत्रातील व्यक्ती
सर्व: समाजसुधारणामहादेव गोविंद रानडे
न्यायमूर्ती, समाजसुधारक आणि आधुनिक भारतीय राजकीय विचारांचे प्रवर्तक. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घटनात्मक…
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
स्वराज्याचे प्रखर पुरस्कर्ते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे लोकनेते. स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि सार्वजनिक उत्सवांच्या…
राजमाता जिजाऊ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता आणि स्वराज्याच्या मूल्यांची जडणघडण करणाऱ्या दूरदर्शी राष्ट्रमाता. इ.स. १६३०च्या दशकात…